सर्पदंश झालेल्या पिंप्राळा येथील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

नोव्हेंबर 4, 2021 12:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२१ । सर्पदंश झालेल्या पिंप्राळा येथील ३० वर्षीय तरुणाचा गुरूवार दि.४ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

मुकेश भिवा सोनवणे (वय-३०, रा.कोळी वाडा, पिंप्राळा) हा तरुण दि.३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिंप्राळा शिवारातील शेतात ट्रक्टरने टिलर काम करीत होता. दरम्यान, या लोखंडी नागरात कचरा अडकल्याने तो कचरा काढण्यासाठी खाली उतरला होता. कचरा काढत असतांना कचऱ्यात असलेल्या सापाने त्याच्या उजव्या हाताला दंश केला होता. त्यानंतर त्याला चक्कर येवू लागल्याने तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. येथे त्याच्यावर उपचार सुरु असतांना गुरूवार दि.४ रोजी पहाटे ५ वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now