आज सोने-चांदीच्या भावात झाली ‘इतकी’ मोठी वाढ, जाणून घ्या ताजे दर

ऑक्टोबर 1, 2021 10:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । मागील गेल्या दोन दिवसापासून जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये सोने आणि चांदीच्या भावात घसरण नोंदविली गेली होती. परंतु आज आठवड्याच्या तर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज (१ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ७६० रुपयाने महागले आहे. तर चांदी १२६० रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल (३०सप्टेंबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर २८० रुपयाने तर चांदी २१३० रुपये प्रति किलोने कमी झाली होती.

gold silver price

आजचा सोने आणि चांदीचा भाव :

आज (१ ऑक्टोबर) जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४७,४१० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६१,०१० रुपये इतका आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जळगाव सराफ बाजारपेठेत देखील सोने आणि चांदीच्या भाव एका विशिष्ट पातळीवरून वर-खाली होतानाचे दिसून आले. सोन्याच्या भावात या आठवड्यातील सर्वात मोठी वाढ झाली आहे. मागील दोन दिवसात सोनं ५०० रुपयाने स्वस्त झालं होतं. परंतु आज तब्बल ७०० रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे.

तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील मोठा बदल दिसून आला आहे. गेल्या दोन दिवसात चांदीच्या भावात तब्बल २३१० रुपयाची घसरण झाली होती. परंतु आज चांदीच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली आहे. आज चांदीच्या भावात १२ रुपयांपेक्षा अधिकची वाढ झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात सोने-चांदीच्या भावात झाली घसरण 

सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या भावात किंचित घसरण झाल्याचे दिसून येतेय. १ सप्टेंबर ला प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,२२० रुपये इतका होता तो आता १ ऑक्टोबर रोजी प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर ४७,४१० रुपये इतका आहे. तर सप्टेंबर महिन्यात चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येतेय. मागील महिन्यात चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येतंय. १ सप्टेंबरला चांदीचा प्रति किलोचा भाव ६४,३९० रुपये इतका भाव होता. तो आज १ ऑक्टोबर रोजी ६१,०१० रुपये इतका आहे.

गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याने प्रतितोळा ५६,२०० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. या तुलनेत सोने सध्या ९००० रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. त्यामुळे ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

२७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत असे होते सोने दर?

सोमवारी (२७ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,०७० होते, त्यात ७० रुपयाची किरकोळ घसरण झाली होती. मंगळावारी (२८ सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४६,९३० इतका होता. त्यात काल २२० रुपयाची घसरण झाली होती. व गुरुवारी (३० सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४६,६५० रुपये इतका आहे.

तर दुसरीकडे मागील काही दिवसापासून चांदीच्या भावात मोठी हालचाली दिसून येत आहे. गेल्या चार दिवसात मोठी घसरण झाली आहे. चांदी ३ हजार १३० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.

पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?

आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now