मोठा दिलासा ; जळगाव जिल्ह्यात आज बाधित संख्या शून्यावर

सप्टेंबर 13, 2021 6:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाहीय. त्यामुळे  जिल्हावासीयांसाठी हा मोठा दिलासा आहे. तर आजही एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज दिवसभरात ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

corona update

जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेनंतर जूनपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येऊ लागला आहे. सलग तीन महिने दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.

मागील गेल्या दोन महिण्यापासून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील काही दिवसापासून नवीन रुग्ण संख्या ५ च्या आत आढळून येत आहे. तर काही दिवसापासून एकही मृत्यूची नोंद नाहीय.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७२९ बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २१ संक्रमित रुग्ण जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आजपर्यंत २५७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९८.१८ इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now