आजचा सोने-चांदीचा भाव : १२ सप्टेंबर २०२१

सप्टेंबर 12, 2021 10:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२१ । मागील काही दिवसापासून सोन्या आणि चांदीचे दर एका विशिष्ठ पातळीवरून वरखाली होतानाचे दिसून आलेय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली होती. परंतु दोन्ही धातूंमध्ये काही दिवस घसरण झालेचे दिसून आले. जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रॅम ४८ हजार २०० च्या घरात आहे. तर चांदी ६६ हजाराच्या घरात आहे.

gold (1)

जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा दर प्रतितोळा दर ४८,६४० रुपये इतका होता. तो आता आठवड्याच्या शेवटापर्यंत ४८,१४० रुपयांच्या पातळीवर आला आहे. त्यामुळे आठवडाभरात सोनं जवळपास ५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे.

देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी ४३ हजारांपर्यंत खाली येऊ शकतात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस येणार आहेत.

 

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करु लागले आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे.

सोने व्यापाऱ्यांना १० लाखापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांचे तपशील ठेवणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८१४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,१४० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६५,६९० रुपये इतका आहे.

 

 

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now