⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज ।६ सप्टेंबर २०२१ ।   मागील गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे.

आज सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रम ५५० रुपयाने वाढ झाली आहे. तर चांदी प्रति किलो १९७० रुपयाने महागली आहे.

शेअर बाजारात तेजी आल्यामुळे देशांतर्गत सोने आणि चांदीच्या भावात घसरण नोंदविली गेली होती. जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं ८० ते १०० रुपयांनी तर चांदीच्या भावात २३० रुपयाची घसरण झाली होती. त्यामुळे सोने दर ४८ हजाराच्या घरात आले आहे.

जळगाव सराफ बाजारात गेल्या गेल्या आठवड्यात सोने ५६० रुपयाने स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या भावात ९२० रुपयाने स्वस्त झाली आहे.

१ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरपर्यंत सोने असे होते दर?

१ सप्टेंबर रोजी सोन्याची किंमत ५० रुपयांनी कमी झाली होती.

२ सप्टेंबर रोजी सोन्याची किंमत ५० रुपयांनी कमी झाली होती

३ सप्टेंबर रोजी सोन्याच्या भावात ८० ते १०० रुपयाची घसरण झाली आहे.

४ व ५  सप्टेंबर रोजी सोने भावात काही बदल दिसून आला नाही.

६ सप्टेंबर रोजी सोन्याच्या भावात ५५० रुपयाची वाढ झाली आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८६४ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,६४० रुपये आहे.

आजचा जळगावातील चांदीचा भाव

चांदीचा एक किलोचा भाव ६६,७४० रुपये इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.