शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेला जमा होणार 9 व्या हप्त्याचे 2,000 रुपये

ऑगस्ट 3, 2021 2:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ ऑगस्ट २०२१ । पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात १० ऑगस्टपासून पीएम किसान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.  पूर्वीप्रमाणेच, ज्यांचा वडिलोपार्जित जमिनीत वाटा आहे त्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. जर तुमच्या नावावर सुद्धा शेतजमीन असेल तर हे काम त्वरित करा अन्यथा तुमचा पुढचा हप्ता अडकू शकेल.

farmer

पीएम किसान योजनेअंतर्गत, मोदी सरकार दरवर्षी 2000, 2000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना 6000 रुपये देते. याअंतर्गत प्रत्येक वर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान दिला जातो.

दरम्यान, ९ व्या हप्त्यासाठी २ हजार रूपयांची लवकरच प्रतीक्षा संपणार आहे. १० ऑगस्टपर्यंत ११.५ कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ आतापर्यंत मिळाला आहे.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. तुम्ही घरबसल्या ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा तलाठी किंवा स्थानिक कॉमन सर्विस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त, आपण या योजनेसाठी स्वतःची नोंदणी देखील करू शकता.

तुम्ही अशा प्रकारे नोंदणी करू शकता

-तुम्हाला आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

-आता Farmers Corner वर जा.

-येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

-यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.

– यासह, कॅप्चा कोड टाकून राज्याची निवड करावी लागेल आणि नंतर प्रक्रिया पुढे चालवावी लागेल.

-या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

-यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतजमिनीशी संबंधित माहिती भरावी लागेल.

-त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now