जळगाव जिल्ह्यात आता ‘इतक्या’ रुग्णांवर उपचार, वाचा आजची आकडेवारी

जुलै 31, 2021 6:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । जिल्ह्यात आज दिवसभरात ०४ नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर १० बरे झाले आहे. आज जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाहीय.

corona update

जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असताना बहुतांश तालुक्यांमधील सक्रिय रुग्णांची संख्या दहाच्या आत आली आहे. त्यामुळे हे तालुके कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ६०१ झाली असून, बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ९४९ वर पोचला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९८.१४ टक्के आहे. जिल्ह्यात आज एकही मृत्यू झालेला नसून एकूण मृताचा आकडा २५७५ वर गेला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-०२, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ -००, अमळनेर -००, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर -००, पारोळा-०, चाळीसगाव-०२, मुक्ताईनगर-००, बोदवड-०० असे एकुण ०४ बाधित रूग्ण आढळले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now