आजचा पेट्रोल डीझेलचा भाव जाहीर ; हा आहे जळगावातील प्रति लिटरचा दर

जुलै 30, 2021 9:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । सरकारी तेल कंपन्यांच्या वतीनं आज सलग तेराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आज सलग १३ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव ‘जैसे थे’च आहे. जळगावात आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे.

petrol diesel

जळगाव शहरात गेल्या ६ महिन्यापूर्वी २५ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलचे दर ९३.४७ रूपये तर डिझेल ८२.५६ प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून ६ महिन्यात पेट्रोलचे दर १५ रूपये ५१ पैशांनी तर डिझेलचे १४ रूपये ५२ पैसे प्रति लिटर वाढले आहेत.

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती ९ वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये ५ वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये १६-१६ वेळा वाढ झाली होती. ४ मेनंतर सलग झालेल्या पेट्रोल-डिझेल यांच्या किमतीतील वाढीमुळे १६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now