आज सोने महाग,चांदीत स्वस्त ; तपासा जळगावातील प्रति तोळ्याचा भाव

जुलै 28, 2021 11:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । कोरोना नियंत्रण आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्याने गुंतवणूकदारांनी मागील आठवड्यात सोन्याची विक्री केली होती. सोने आणि चांदीच्या किमतीत यामुळे घसरण झाली. मात्र त्या पडझडीतून दोन्ही धातू सावरले आहेत.

gold silver 5

दरम्यान, जळगाव सराफ बाजारात दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज बुधवारी सोनं महागल आहे. तर चांदीच्या भावात मोठी घट झाली आहे. आज सोने प्रति १० ग्रॅम १२० रुपयाने महागले आहे. तर चांदी १ हजार ९० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे चांदी ७० हजाराच्या खाली आली आहे.

गेल्या आठवड्याचा विचार करता सोन्याची किंमतींत घसरण आणि स्थिरता दिसून येते. २१ जुलैला सोने स्थिर होते तर २२ जुलैला ५३० रुपयाने स्वस्त, २३ जुलैला ६० रुपयांची वाढ, २४ व २५ जुलै ला स्थिर, २६ जुलैला १०० रुपयाने तर २७ ला ८० रुपयाने स्वस्त झाले होते. त्यानंतर आज बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झालीय. सोन्याच्या दरात किरकोळ घसरण होत असली तरी त्यामध्ये सातत्य आहे. सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नसल्याचं तज्ञांचं मत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.  

चांदीच्या दराचा विचार करता गेल्या महिन्यापासून त्यामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या महिन्यात, 1 जून रोजी चांदीची किंमत ही ७० हजाराच्या वर होते  त्यानंतर किंमतीत घट होऊन ती ७० हजारांच्या खाली आले आहे.

आजचा जळगावातील सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४,८६९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,६९० रुपये इतका आहे.

 आजचा जळगावातील चांदीचा भाव

चांदीचा एक किलोचा भाव ६७,६०० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now