सकारात्मक : जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या १०० च्या आत, वाचा आजची आकडेवारी

जुलै 23, 2021 6:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । जळगाव जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर येवून पोहोचला आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात  ०६ नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर आज १० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील गेल्या एक दीड महिन्यापासून मृताची संख्या शून्य वर आढळून आहे. त्यामुळे हा जिल्ह्यासाठी मोठा दिलासा आहे.

corona

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मार्च ते मे अशा दोन-अडीच महिन्यांमध्ये तीव्रतेवर होता. नंतर मात्र लाट ओसरायला सुरवात झाली आणि आता जुलैच्या अखेरीस सक्रिय रुग्णसंख्या शंभराच्या टप्प्यात येण्यापर्यंत संसर्ग नियंत्रणात आला आहे. आज जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजारावर गेली होती. 

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १,४२,५५२ इतकी झाली आहे. त्यात उपचार घेऊन बरे  होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ८७७ वर आहे. जिल्ह्यात सध्या १०० रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आज पर्यंत २५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-०१, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ -०१, अमळनेर -०, चोपडा-०१, पाचोरा-००, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०१, एरंडोल-०, जामनेर-२, रावेर -०, पारोळा-०, चाळीसगाव-०२, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण६ बाधित रूग्ण आढळले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now