पेट्रोल-डीझेलचा दर ; हा’ आहे आजचा जळगावातील दर

जुलै 23, 2021 11:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । पेट्रोलियम कंपन्यांनी सहाव्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज शुक्रवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव जैसे थे आहे.

petrol diesel

सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही विक्रमी पातळीवर आहेत. पेट्रोल झपाट्याने ११० रुपयांच्या दिशेने तर डिझेल शंभरीच्या दिशेने कूच करत आहे.  त्यामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. 

आज शुक्रवारी जळगावमध्ये एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपयांवर गेले आहे. तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे. 

गेल्या २० ते २२ दिवसात जळगाव शहरात पेट्रोल दर २.२७ पैसे तर डिझेल ७२ पैशांनी महागले आहे. याच पध्दतीने दरात किरकोळ वाढ होत गेली तर पुढील काही दिवसात पेट्रोल ११० रूपये प्रति लिटर मिळेल यात शंका नाही. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे आधीच सर्वसामान्यांची परिस्थिती नाजूक असताना इंधन दरवाढ सुरूच आहे.

जळगाव शहरात गेल्या वर्षी १४ जून २०२० रोजी पेट्रोलचे दर ८३.७१ रूपये तर डिझेल ७२.५४  प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून तेरा महिन्यात पेट्रोलचे दर २५ रूपये २७ पैशांनी तर डिझेलचे २४ रूपये ५४ पैसे प्रति लिटर वाढले आहेत. जुलै २०२१ या महिन्यात  दरात तब्बल ९ वेळा वाढ करत कंपन्यांनी वाहनधारकांना मोठा झटका दिला. त्यामुळे जनतेत रोष आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now