सोनं आणखी स्वस्त ; वाचा आजचे सोने-चांदीचे नवे दर

जुलै 23, 2021 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे सध्या सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आज सलग तिसऱ्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मागील तीन दिवसापासून सोन्याच्या दर घसरत आहे. त्यामुळे सोने ४८ हजाराजवळ आले आहे. मात्र, आज चांदीच्या भावात वाढ झाली आहे.

gold silver 7

आज शुक्रवारी २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ३६० रुपयाने तर २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ३५० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदी ३०० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी काल गुरुवारी २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ३७० रुपयाने स्वस्त झाले होते तर चांदी ८०० रुपयाने स्वस्त झाली होती. 

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. तर चांदीच्या दराने देखील ७० हजाराचा टप्पा गाठला होता. 

परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने जवळपास ७ हजाराने स्वस्त झाले आहे. सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. सध्या जळगाव सराफ बाजारात सोने ४८ हजाराच्या घरात आहे.  

दरम्यान, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली असून यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.  त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी आत्ताच उत्तम संधी असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. कोरोनाचं संकट, लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसारखे नियम यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत आहेत. 

आजचा सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८०२ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,०२० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५७३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,७३० रुपये आहे.

चांदीचा भाव

तर आज चांदीच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज चांदी ४०० रुपयाने महागली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७१,९०० रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now