जळगाव जिल्ह्यात आज ‘इतके’ नवीन रुग्ण आढळले ; वाचा

जुलै 12, 2021 6:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. आज सोमवारी दिवसभरात कोरोनाचे नवे १५ रुग्ण आढळून आले आहे. तर २२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीय. दरम्यान, आज तब्बल दहा तालुके निरंक आहे.

corona

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नवीन रुग्णांची संख्या २० च्या आत आढळून येत आहे.  आज १५ रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १ लाख ४२ हजार ४६९ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ६३८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात सध्या आता २५७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यातील मृताचा एकूण आकडा २५७४ वर गेला आहे. 

आजची आकडेवारी

जळगाव शहर-०३, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-३, अमळनेर-०२, चोपडा-००, पाचोरा-००, भडगाव -००, धरणगाव-००,  यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-०२, पारोळा-००, चाळीसगाव-०३, मुक्ताईनगर-००,  बोदवड-०० व इतर जिल्ह्यातील ०१ असे एकुण १५ बाधित रूग्ण आढळले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now