गुन्हेजळगाव शहर

जळगाव MIDC पोलिसांची मोठी कामगिरी! ३ लाखांचे गहाळ मोबाईल शोधून मालकांच्या स्वाधीन

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव एमआयडीसी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तब्बल १८ हरविलेले मोबाईल फोन शोधून काढले आहेत. या मोबाईलची अंदाजे किंमत ३ लाख रुपये असून, पोलिसांनी ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील नागरिकांचे हरविलेले व गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व अंमलदारांना मार्गदर्शन करून विशेष मोहीम सुरू केली होती.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे यश
एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरविलेल्या मोबाईल संदर्भात तांत्रिक तपासणी करण्यात आली. यादरम्यान CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पो.हे.कॉ. मोतीलाल विठ्ठल बोरसे, पो.हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी आणि पो.अं. रामकला राठोड यांनी तांत्रिक माहितीचे सखोल विश्लेषण करून विविध ठिकाणचे एकूण १८ मोबाईल फोन यशस्वीरीत्या हस्तगत केले.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार व कौतुक
सदरची ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पार पडली.या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पो.हे.कॉ. मोतीलाल विठ्ठल बोरसे, पो.हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी व म.पो.अं. रामकला राठोड यांनी उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, नागरिकांनी पोलिसांच्या या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button