जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने तीन साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये साईनगर शिर्डी–बीकानेर, उधना–झंझारपूर आणि उधना–मधुबनी या विशेष गाड्यांचा समावेश आहे. विशेष या गाड्यांना भुसावळ स्थानकांवर थांबा असल्याने सणासुदीच्या काळात प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.

साईनगर शिर्डी–बीकानेर विशेष गाडी
साईनगर शिर्डी–बीकानेर विशेष रेल्वे (०४७१६) आता ४ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत धावणार आहे. तसेच बीकानेर–साईनगर शिर्डी विशेष रेल्वे (०४७१५) परतीच्या प्रवासासाठी ३ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

उधना–झंझारपूर विशेष रेल्वेला मुदतवाढ
उधना–झंझारपूर विशेष रेल्वे (०९०४७/०९०४८) च्या फेऱ्यांनाही मुदतवाढ देण्यात आली आहे. उधनावरून सुटणारी गाडी पूर्वी १३ सप्टेंबरपर्यंत धावणार होती; आता ती २७ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तर झंझारपूरवरून सुटणारी गाडी पूर्वी १४ सप्टेंबरपर्यंत होती; आता २८ सप्टेंबरपर्यंत धावेल.
उधना–मधुबनी विशेष रेल्वेही सुरू राहणार
उधना–मधुबनी विशेष रेल्वे (०९०४५/०९०४६) च्या फेऱ्यांनाही वाढ देण्यात आली आहे. उधनावरून सुटणारी गाडी २७ सप्टेंबरपर्यंत, तर मधुबनीवरून सुटणारी गाडी २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. गणेशोत्सव तसेच आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने या विशेष रेल्वे सेवांचा प्रवाशांना फायदा होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक आणि फेऱ्यांची माहिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.









