सणासुदीपूर्वीच सोने-चांदीने फोडला ग्राहकांना घाम; जळगावमध्ये सलग 9 व्या दिवशी मोठी वाढ, पहा ताजे दर?

ऑगस्ट 13, 2026 11:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे सणासुदीच्या दिवसांना सुरूवात होत असताना सोन्यासह चांदी दरात होणारी दरवाढ काही थांबताना दिसत नाहीय. जळगाव शहरातील सुवर्णबाजारात सोन्या-चांदीच्या दरात सलग नवव्या दिवशी तेजी कायम आहे. मागच्या २४ तासात सोन्याच्या दरात तब्बल 1,133 रुपयांची, तर चांदीच्या दरात 3,090 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर 1,58,311 रुपये प्रति तोळा, तर चांदीचा दर 2,48,230 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

gold silver jpg webp

गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या कालावधीत सोन्याच्या दरात एकूण 11,948 रुपयांची, तर चांदीच्या दरात 23,687 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 1,47,290 रुपये प्रति तोळा असलेले सोने आता 1,58,311 रुपयांवर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दर 2,28,660 रुपयांवरून वाढून 2,48,230 रुपये प्रति किलो झाला आहे.

अमेरिकेचा महागाई दर जाहीर होण्यापूर्वी जागतिक बाजारात सावध वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चितता आणि जोखीम टाळण्यासाठी गुंतवणूकदारांकडून सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

चांदीच्या दरातील तेजीमागे गुंतवणुकीसोबतच औद्योगिक क्षेत्रातून वाढलेली मागणी हे देखील महत्त्वाचे कारण मानले जात आहे. दरम्यान, सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली असून, सराफा बाजारातील ग्राहकांची गर्दी तुलनेने कमी झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now