जळगावात पेट्रोल पाठोपाठ डीझेल शंभरीच्या देशेने ; जाणून घ्या आजचे दर

जून 26, 2021 11:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी सुरु केलेली इंधन दरवाढ अद्याप थांबलेली नाही. यामुळे देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडल्यानंतर आता डिझेलही शंभरीच्या देशेने जाऊ लागले आहे. जळगावमध्ये आज पेट्रोल १०५ रुपयाच्या वर गेले आहे. तर डीझेल ९५ रुपयाच्या वर गेले आहे.

petrol diesel

राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात महागाईचा भडका उडालेला दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सततच्या भाव वाढीने जळगावमध्ये पेट्रोल इतिहासात पहिल्यांदा १०० च्या वर गेले आहे.

जळगावमध्ये आज शनिवारी पेट्रोल १०५.४० रुपये प्रति लिटर आहे. तर डीझेल ९५.८२ रुपये आहे. आधीच पेट्रोलने शंभरीचा टप्पा ओलांडला असता त्यात सतत होत असलेल्या दरवाढीने डीझेलही लवकरच शंभरी पार करण्याची शक्यता आहे.

जळगावमध्ये जून २०२१ च्या सुरवातीला पेट्रोलचा दर १०१.३३ रुपये प्रति लिटर होता. तो आज १०५.४० रुपये पर्यंत आहे. गेल्या २५ दिवसात पेट्रोल तब्बल ४ रुपयाने वाढले आहे. तर याच महिन्याच्या सुरुवातील डीझेल ९१.८६ रुपये प्रति लिटर होते. ते आज ९५.८२ प्रति लिटर झाले आहे. डीझेलमध्ये देखील गेल्या २५ दिवसात ४ रुपयाची वाढ झाली आहे. 

वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोल ९१.५८ रुपये तर डिझेल ८०.९० प्रतिलिटर होते. त्यानंतर १ फेब्रुवारीला पेट्रोल ९४.०६ रुपये, १ मार्चला ९८.६१ रुपये राहिले. ही दरवाढ कायम राहत अखेर मे महिन्याच्या मध्यांतरात म्‍हणजे १६ मे रोजी पेट्रोलने शंभर रुपयांचा आकडा पार करीत १००.१० रुपये प्रति लिटरवर ते पोहचले. 

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now