ग्राहकांना दिलासा ; बाजार उघडताच सोन्यासह चांदीचे भाव कोसळले; आजचे दर तपासून घ्या

मे 5, 2026 11:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२६ । गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदी दरात सातत्याने चढ उतार सुरु असून आज दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा देणारी बातमी आहे. पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वधारले असले, तरी त्याचा उलटा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला असून मौल्यवान धातूंचे भाव घसरले आहेत.

gold silver 1 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम सुमारे 440 रुपयांची घसरण झाली असून भाव 1,49,180 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोने 400 रुपयांनी स्वस्त होऊन 1,36,750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. 18 कॅरेट सोन्यातही 330 रुपयांची घसरण झाली असून त्याची किंमत 1,11,890 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे.

चांदीच्या किमतीतही आज मोठी घसरण दिसून आली. भारतात चांदीचा दर सध्या 255 रुपये प्रति ग्रॅम आणि 2,55,000 रुपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत प्रति ग्रॅम 10 रुपये आणि प्रति किलो तब्बल 10,000 रुपयांची घट झाली आहे

किमती घसरण्याचे मुख्य कारण काय?
बाजार तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे जागतिक बाजारात काही प्रमाणात अस्थिरता आहे, मात्र गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्यामुळे आणि चलनातील चढ-उतारामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ही घसरण पाहायला मिळत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now