जळगाव लाईव्ह न्यूज । विधान परिषदेच्या रिक्त १० जागांवर कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले असताना या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात पक्षाने पुन्हा एकदा आपल्या ‘धक्कातंत्रा’चा वापर केला असून विद्यमान आमदारांना डच्चू देत भाजपने पूर्णपणे नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यात विभागीय समतोल साधण्यावर भर देण्यात आला आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. यामधील भाजपच्या वाट्याला ६ जागा येत आहेत. भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी राज्यातील बऱ्याच बड्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते. वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या जात होत्या. परंतु भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे

यामध्ये भाजपाने यावेळी माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. तर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता सातव यांनादेखील विधानपरिषदेचे तिकीट देण्यात आले आहे.










