जळगावात वातावरण बदलले; वादळी वारा, विजांच्या कडकडाटसह पावसाची हजेरी

मार्च 30, 2026 5:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून आज सोमवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल दिसून आला आहे. शहरात आकाश ढगांची गर्दी झाली असून काही भागात विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसत आहे. पुढचे काही तासात महत्वाचे असणार आहेत.

rain

हवामान खात्यानं वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३० आणि ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यात जोरदार वादळ, पावसासह गारपिटीचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. आज सोमवारी दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले असून काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसत आहे.

यादरम्यान वादळी वाराही सुटला असून यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून उष्णतेच्या तडाख्याने लाहीलाही झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला. मात्र या अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पुढील काही तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पावसामुळे शेतीपिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now