Ducati ची पहिली डर्ट बाईक Desmo450 MX भारतात लॉन्च; किंमत अन् वैशिष्ट्ये घ्या जाणून..

मार्च 16, 2026 5:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । इटलीची प्रसिद्ध सुपरबाईक निर्माता कंपनी Ducati ने भारतीय बाजारात आपली पहिली डर्ट बाईक Ducati Desmo450 MX लॉन्च केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार परफॉर्मन्ससह आलेल्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत 17.24 लाख रुपये ठेवण्यात आली आहे

Ducati Desmo450 MX

ऑफ-रोड रेसिंग आणि कठीण ट्रॅकसाठी विशेषतः तयार करण्यात आलेली ही बाईक हलक्या पण मजबूत फ्रेमसह सादर करण्यात आली आहे. शक्तिशाली इंजिन, प्रगत सस्पेन्शन आणि उत्कृष्ट कंट्रोलमुळे ही बाईक रेसिंगप्रेमींसाठी खास आकर्षण ठरणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

डर्ट रेसिंग सेगमेंटमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी कंपनीने ही बाईक विकसित केली असून ती परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत प्रगत मानली जात आहे. भारतातील प्रीमियम बाईक प्रेमी आणि ऑफ-रोड रेसिंग उत्साहींसाठी ही बाईक एक नवीन पर्याय ठरणार आहे.

विशेष वैशिष्ट्ये कोणती आहेत?

डुकाटीने या मोटरसायकलमध्ये रायडिंग मोड्स, डीटीसी, ईबीसी, फॉल डिटेक्शन, पॉवर लाँच, क्विक शिफ्ट अप, लिथियम-आयन बॅटरी, अॅडजस्टेबल हँडलबार, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आणि सिंगल सीट प्रदान केले आहे. या मोटरसायकलमध्ये ४५० सीसी इंजिन दिले आहे, जे ४६.७ किलोवॅट पॉवर निर्माण करते. त्यात पाच गीअर्स आहेत.

भारतीय बाजारपेठेत या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १७,२३,६०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक सध्या केवळ निवडक शहरांमधील ४ डीलरशिप्सवर उपलब्ध असेल. यामध्ये पुणे, नवी दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई यांचा समावेश आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now