मध्यमवर्गीयांसाठी खुशखबर ! होंडाची बाईक आता अधिक स्वस्त, किंमत ऐकून व्हाल थक्क..

फेब्रुवारी 17, 2026 12:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दुचाकी बाजारात किफायतशीर सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढत असताना जपानी वाहननिर्माता Honda ने ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या १०० सीसी श्रेणीतील लोकप्रिय Honda Shine १०० या मॉडेलच्या किमतीत कपात जाहीर केली असून त्यासोबत आकर्षक ऑफर्सही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये विश्वासार्ह बाईक शोधणाऱ्यांसाठी हा पर्याय अधिकच आकर्षक ठरत आहे.

honda shine 100

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खडबडीत रस्ते आणि शहरातील गर्दीच्या मार्गांवर सहज धावू शकेल अशा पद्धतीने या बाईकची रचना करण्यात आली आहे. मायलेज किंग’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या या मॉडेलचे डिझाईन सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजांनुसार ठेवण्यात आले आहे. ७८६ मिमी सीट उंची आणि लांब, आरामदायी सीटमुळे सर्व वयोगटातील रायडर्सना ती सहज हाताळता येते. अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायरमुळे खराब रस्त्यांवरही संतुलन राखणे सोपे जाते.

काय आहेत फीचर्स?
इंजिनबाबत बोलायचे झाल्यास, ९८.९८ सीसी क्षमतेचे इंजिन आणि पीजीएम-एफआय (PGM-FI) तंत्रज्ञानामुळे गाडीचा परफॉर्मन्स स्मूथ राहतो. शहरातील वारंवार थांबा-चालू परिस्थितीतही इंजिन सहज सुरू होते. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक प्रतिलिटर सुमारे ६५ ते ७० किमीपर्यंत मायलेज देते, त्यामुळे इंधन खर्चात बचत होते.सुरक्षेसाठी कॉम्बी-ब्रेक सिस्टम (CBS) आणि साइड स्टँड इंजिन कट-ऑफ सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे रोजच्या वापरात अधिक सुरक्षितता मिळते.

किती आहेत किंमत?
फेब्रुवारी २०२६ पर्यंत उपलब्ध माहितीनुसार या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे ६५ हजार रुपयांपासून सुरू होते. ऑन-रोड किंमत शहर आणि विमा पर्यायानुसार अंदाजे ७९ ते ८३ हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते. वाढत्या महागाईच्या काळात परवडणाऱ्या दरात उपलब्ध असलेली ही बाईक मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी बजेट-फ्रेंडली पर्याय ठरत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now