रेल्वेचा ब्लॉक ! भुसावळमार्गे धावणाऱ्या 6 गाड्या रद्द, प्रवासाआधी घ्या जाणून

जानेवारी 29, 2026 11:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भुसावळ -बडनेरा रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या जलंब रेल्वे स्थानकावर डाउन लूप लाइनचा विस्तार, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीसाठी रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. यामुळे ३० जानेवारीला चार प्रवासी गाड्या विभागात ठिकठिकाणी थांबवल्या जातील. तर सहा गाड्या रद्द केल्या आहेत.

train

ब्लॉक कालावधीत भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे नियमन होईल. २०८२४ अजमेर- पुरी एक्स्प्रेस २ तास ३० मिनिटे, गाडी क्र. २२७१० अंब अंदौरा हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस २ तास, ११०४० गोंदियाकोल्हापूर २ तास, १२७५१ हजूर साहिब नांदेड – जम्मूतवी १.३०तास थांबवली जाईल.

या गाड्या रद्द
काही प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. त्यात ३० जानेवारीला ६११०१ भुसावळ – बडनेरा मेमू, ६११०२ बडनेरा – भुसावळ मेमू, १११२१ भुसावळ – वर्धा, १११२२ वर्धा भुसावळ, ०१२११ – बडनेरा – नाशिक रोड विशेष गाडी रद्द केली आहे. ०१२१२ नाशिक रोड बडनेरा विशेष -गाडी २९ जानेवारीला धावणार नाही. रेल्वे प्रशासनाने हे ब्लॉक पायाभूत सुविधांची सुधारणा करण्यासाठी घेतले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now