जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होत असून दोन्ही धातूंचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. दरम्यान आजदेखील सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे.

आज शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा १ तोळाचा भाव ७७० रुपयांनी वाढला असून हे दर १,४०,०२० रुपयांवर पोहोचले आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६१६ रुपयांनी वाढले असून हे दर १,१२,०१६ रुपये झाले आहेत.

आज २२ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे ७०० रुपयांनी वाढले आहेत हे दर १,२८,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५६० रुपयांनी वाढले असून १,०२,६८० रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७००० रुपयांनी वाढले असून हे दर १२,८३,५०० रुपये झाले आहेत.
दरम्यान सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावातील सराफ बाजारात चांदीच्या दराने सव्वा दोन लाखाचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासात चांदीच्या दरात १०३० रुपयाची वाढ झाली असून यामुळे एक किलो चांदीचा दर २ लाख २८ हजार ६६० रुपयावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे सोने दरात सध्या १ लाख ४१ हजार रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याचा भाव असाच आश्चर्यकारकरित्या वाढला आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने तेजी दिसत असून, शुक्राच्या अस्तामुळे लग्नसराई थांबली असतानाही सोन्याच्या व्यापारात लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे. नवीन वर्षाच्या आधी येणाऱ्या खरमासमुळे विवाह सोहळ्यांवर ब्रेक लागला असला, तरी गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वळल्याने सोन्या–चांदीला मोठी मागणी आहे.












