जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव-भुसावळ मार्गवरील नशिराबाद टोल नाक्याजवळ बसचे टायर फुटून झालेल्या अपघातात एका प्रवाशी वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी आ बसचालकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, अमळनेर आगाराची बस क्रमांक (एमएच-१४ बीटी-२३०६) ही जळगावकडून भुसावळकडे जात असताना बस नशिराबाद टोल नाक्याजवळ अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर फुटल्याने बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट टोल नाक्याजवळील एका भिंतीवर जाऊन आदळली. या अपघाताच्या धक्क्याने बसमध्ये साराबाई गणेश भोई (वय ४६ रा. पाडळसा ता. यावल) बसमधून खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्या.

दुर्दैवाने, त्या बसच्या मागील चाकाखाली आली आणि चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी मयत महिलेचा मुलगा किरण गणेश भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक किशोर रामचंद्र जावळे रा. भुसावळ याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










