जळगाव लाईव्ह न्यूज । आजकाल प्रत्येकाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे. त्याचे कारण म्हणजे ते देत असलेले परतावे. म्युच्युअल फंडांवर किमान अपेक्षित परतावा १२ ते १४ टक्के आहे. तथापि, हा परतावा बाजारातील चढउतारांवर देखील अवलंबून असतो. SIP मधून तुम्ही छोट्या हप्त्यांमध्ये गुंतवणूक करून भविष्यासाठी मोठा फंड तयार करू शकता. आज, आपण 5000 रुपयांच्या SIP मधून 10 वर्षांनी किती रुपये मिळणार.. याबाबत जाणून घेणार आहोत..

गुंतवणूक रक्कम – दरमहा 5,000 रुपये
गुंतवणूक परतावा – 12 टक्के

जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांसाठी दरमहा 5,000 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला 12 टक्के परताव्यावर 11,62,000 रुपये मिळतील. या 10 वर्षांत मूळ रक्कम 6 लाख रुपये असेल. तुम्हीही अलीकडेच SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा किती काळ आणि किती गुंतवणूक करावी याबद्दल संभ्रमात असाल तर 12 + 12 + 20 फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
12+12+20 हे सूत्र काय आहे? 12. आपल्या उत्पन्नाच्या 12 टक्के गुंतवणूक करा 12. किमान अंदाजित परतावा 12 टक्के असेल.
20-20 वर्षांसाठी गुंतवणूक करा 12 + 12 + 20 फॉर्म्युलासह तुम्ही SIP गुंतवणूकीशी संबंधित गोंधळ दूर करू शकता. या फॉर्म्युला अंतर्गत तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 12 टक्के रक्कम गुंतवणुकीसाठी ठेवली पाहिजे. तरच तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल. दरम्यान, म्युच्युअल फंड SIP मध्ये वर मिळणार हा परतावा बाजाराच्या चढउतारांवर अवलंबून असतो. याचा अर्थ असा की हा परतावा कमी किंवा जास्त असू शकतो. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणणे गरजेचे आहे.
टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही.)












