जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस सुरूच; तलाठ्याला ट्रकवरून फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न

ऑक्टोबर 13, 2025 11:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. अनेक वेळा जिल्ह्यात वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात आल्याच्या घटना घडल्या. आता अशीच घटना चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे घडली. येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करणाऱ्या तलाठ्यावर प्राणघातक हल्ला झालाय. तलाठ्याला ट्रकवरून फेकून देत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे जळगावातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

valu 1

ही थरारक घटना बुधगाव-जळोद (ता. चोपडा) रस्त्यावर घडली. ट्रॅक्टरचालक विजय पावरा आणि मालक अजय कैलास कोळी (दोघे रा. बुधगाव, ता. चोपडा) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. हातेड भागातील मंडळाधिकारी रवींद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली मंगरूळचे ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी, संतोष कोळी, वर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सुधाकर महाजन, अकुलखेडेचे तिलेश पवार आणि बुधगावचे भूषण पवार यांच्या पथकाला बुधगावनजीक वाळूने भरलेला ट्रॅक्टर दिसला. पथक ट्रॅक्टर चोपडा तहसील कार्यालयाकडे नेत असताना विजय पावरा आणि अजय कोळी यांनी रस्त्यात वाद घातला.

पावराने ट्रॅक्टरवर बसलेले अनंत माळी यांना खाली ओढत ट्रॅक्टरच्या मागील चाकाच्या समोर फेकले. मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी प्रसंगावधान राखत अनंत माळी यांना बाजूला ओढले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, त्यांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. याच वेळी चालक व मालकाने वाळू ओतून ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळ काढला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now