जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२५ । दिवाळी आणि छट सणाच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाराणसी दरम्यान १२ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामुळे मुंबई आणि उत्तर भारतात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष या गाड्या भुसावळ मार्गे धावणार आहे.

गाडी क्र. ०४२२५ ही दि. १४ ऑक्टोबर २०२५ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून सायंकाळी १६.५५ वाजता सुटणार आहे. यानंतर भुसावळ स्टेशनला ०.४५ ला पोहोचेल. यांनतर ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ०२.०५ वाजता वाराणसी येथे पोहोचेल. तर, विशेष गाडी क्र. ०४२२६ ही गाडी १३ ऑक्टोबर २०२५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दर सोमवारी वाराणसी येथून पहाटे ०१.३५ वाजता सुटेल आणि भुसावळ स्टेशनला दुसऱ्या दिवशी पहाटे ४. ५५ मिनिटाने पोहोचेल. यांनतर त्याच दिवशी दुपारी १४.२५ वाजता मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

ट्रेन या स्थानकांवर थांबेल?.
या गाड्या ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती (भोपाळ), बीना, वीरंगना लक्ष्मीबाई झांसी, औरैया, कानपूर सेंट्रल, लखनऊ, सुलतानपूर आणि जौनपूर सिटी स्थानकांवर थांबतील.
या ट्रेनमध्ये एकूण १५ डबे असतील, ज्यामध्ये ४ एसी २-टायर, ९ एसी ३-टायर आणि २ जनरेटर कार असतील. ट्रेन क्रमांक ०४२२५ चे तिकीट बुकिंग १२ ऑक्टोबर २०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी वेबसाइट www.irctc.co.in वर सुरू होईल. प्रवासी रेल्वे वेबसाइट www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊन किंवा NTES अॅप डाउनलोड करून स्टेशनवर थांबण्याच्या वेळा आणि इतर माहिती तपासू शकतात.












