इंधन दरवाढीचा भडका : तपासा आजचे पेट्रोल आणि डीझेलचे नवे दर

जून 16, 2021 12:02 PM

 जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२१ । देशात इंधन दरवाढ सुरूच आहे. आज बुधवारी पुन्हा पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डीझेलच्या दरात वाढ केली आहे. आज पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे २५ पैशांनी तर डिझेलचे दर १३ पैशांनी वाढवले आहेत. त्यामुळे जळगावमध्ये पेट्रोल १०३ रुपयाच्या वर गेले आहे. तर डीझेल ९४.२६ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०२ रुपये प्रति लिटरपेक्षाही अधिक झालीय. तर डिझेलसाठी ९४.८४ रुपये मोजावे लागताय.

petrol diesel

इंडियन ऑइल कॉर्परेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्या रोज इंधनाचे दर बदलत असतात. जागतिक स्तरावर तेलाचे दर वाढल्याने इंधन दरवाढ होत असल्याचं सांगण्यात येत आहे. रोज सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू केले जातात. वेगवेगळ्या राज्यांकडून आकारण्यात येणारे कर हे वेगवेगळे असल्याने देशभरामध्ये राज्यनिहाय दर बदलतात. 

 

महाराष्ट्रातील दर किती?

महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचे दर १०५.१५ रुपये आणि डिझेलचे दर ९५.६३ रुपयांपर्यंत पोहचलेत. नागपूरमध्ये पेट्रोल मुंबईप्रमाणेच १०२ रुपयांहून अधिक किंमतीला मिळत आहे. नांदेडमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी जवळजवळ १०५ रुपये मोजावे लागत आहेत. बीड, जालना, सिंधुदुर्ग, यवतमाळमध्येही पेट्रोलचे दर १०४ रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक आहेत.

अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, वर्धा, वाशिममध्ये एका लिटर पेट्रोलसाठी १०३ रुपयांपेक्षा अधिक किंमत मोजावी लागत आहे. मुंबईसोबतच अकोला, चंद्रपुर, धुळे, नवी मुंबई, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सांगली, ठाण्यात पेट्रोलचे दर १०२ रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now