ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! बँकेने मिनिमम बँलेंसची लिमिट घटवली, आता खात्यात किती पैसे ठेवावे लागणार?

ऑगस्ट 14, 2025 11:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२५ । एकीकडे काही बँकांनी खात्यावरील मिनिमम बॅलेंसची लिमिट वाढवली असून यामुळे ग्राहकांना धक्का बसला आहे. मात्र यातच देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आयसीआयसीआय बँकेने मिनिमम बँलेसची लिमिट कमी केली करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आयसीआयसीआय बँकांच्या ग्राहकांना दिलासा मिळालं.

icici jpg webp

दोन दिवसांपूर्वीच आयसीआयसीआय बँकेने किमान बँलेंस ठेवण्यासाठी अट ५०,००० रुपये केली होती. त्यानंतर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बँकेने आता पुन्हा किमान बँलेस कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मिनिमम बँलेंस ठेवण्याची लिमिट १५००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

आता सेमी अर्बन आणि ग्रामीण भागातील बँकेत तुम्हाला कमीत कमी ७५०० किंवा २,५००० रुपये ठेवणे गरजेचे आहे.बँकेने याबाबत माहिती देताना सांगितले की, हा बदल सॅलरी अकाउंट, ज्येष्ठ नागरिक पेन्सनधारक, बेसिक बँकिंग सेव्हिंग डिपॉझिट अकाउंट, जन धन खाती यासाठी लागू होणार नाही. तसेच ६० वर्षांखालील पेन्सनधारक आणि काही विद्यार्थ्यांना या किमान शिल्लक रक्कमेच्या अटीमधून सूट देण्यात आली आहे.

किमान रक्कम न ठेवल्यास आकारला जाणार दंड

नवीन नियमांनुसार, जर तुम्ही खात्यात किमान १५०० रुपये ठेवले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. जेवढी रक्कम कमी तेवढे ६ टक्के किंवा ५०० रुपये दंड आकारला जाईल.याआधी बचत खात्यासाठी किमान शिल्लक (MAMB) रक्कम १०,००० रुपये ठेवावी लागायची. अलीकडेच, बँकेने शहरी ग्राहकांसाठी ती लिमिट ५०,००० केली होती. त्यानंतर आता पुन्हा कमी केली आहे. अरध-शहरी शाखांसाठी ही रक्कम ५००० रुपयांवरुन २५००० रुपये करण्यात आली, ग्रामीण शाखांसाठी किमान रक्कम ५००० वरुन १०,००० रुपये करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now