जळगाव लाईव्ह न्यूज । भारतामध्ये राजकीय नेते वृद्धापकाळापर्यंत राजकारणात सक्रिय राहतात. राजकीय निवृत्तीनंतर वेगळ्या क्षेत्रात काम करणारे नेते फार कमी आहेत. पण भाजप नेते आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत एक वेगळा विचार मांडलाय. राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर माझे आयुष्य वेद, उपनिषदे आणि नैसर्गिक शेतीच्या अभ्यासासाठी समर्पित करणार, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

अहमदाबादमध्ये त्यांनी ‘सहारा संवाद’ द्वारे गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सहकारी क्षेत्राशी संबंधित महिला आणि इतर सहकारी चर्चा केली. शाह म्हणाले, मी ठरवले आहे की निवृत्त होईन तेव्हा मी माझे उर्वरित आयुष्य वेद, उपनिषदे आणि नैसर्गिक शेतीमध्ये घालवीन. शाह यांनी नैसर्गिक शेतीला एक वैज्ञानिक प्रयोग म्हणून वर्णन केले आणि सांगितले

की ते अनेक फायदे देते. ते शरीर निरोगी ठेवते आणि उत्पादनदेखील वाढवते. शाह म्हणाले की खतासोबत गहू खाल्ल्याने कर्करोग होतो, बीपी वाढतो, मधुमेह होतो आणि थायरॉइडची समस्या निर्माण होते. सुरुवातीला आम्हाला माहीत नव्हते, परंतु आता आपण रसायनांशिवाय अन्न खात आहोत. ते म्हणाले की शरीर निरोगी ठेवण्यासाठी खताशिवाय अन्न खाणे आवश्यक आहे. याचा अर्थ शरीराला औषधांची गरज नाही. नैसर्गिक शेतीचे फायदे स्पष्ट करताना शाह म्हणाले की ते उत्पादन वाढवते. त्यांनी त्यांच्या शेतात नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे आणिउत्पादनात सुमारे दीड पट वाढ झाली आहे.












