Gold Rate : जळगावच्या सुवर्णबाजारात सोने 1200 रुपयांनी घसरले, वाचा आताचे ताजे दर..

जुलै 10, 2025 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२५ । सोने दरात सध्या चढ उतार दिसून येत आहे. दरम्यान जळगावच्या सुवर्णबाजारात सोने दरात पुन्हा एकदा घसरण झालीय. ट्रम्प सरकारने पुन्हा टेरिफ रेटचे नवे धोरण जाहीर केल्याने सोन्याच्या दरात तेजी आलेली असताना बुधवारी सोने तब्बल १२०० रुपयांनी घसरले. यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

gold silver jpg webp

जळगाव सराफ बाजारात बुधवारी सोन्याचा दर १२०० रुपयांनी घसरले. त्यामुळे सध्या सोन्याचे प्रती तोळ्याचे दर ९६३०० (जीएसटीसह ९९१८९) रुपयांवर आले. आठ दिवसांनी सोने १ लाखांच्या खाली गेले आहे.

दोन दिवसांपूर्वी ट्रम्प सरकारने नव्याने टेरिफ धोरण जाहीर केले. टेरिफ धोरणाचे पडसाद अजून पडण्याची अपेक्षा सराफी व्यावसायिकांना होती. त्यामुळे सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र मंगळवारी ९७५०० (१००४२५) रुपये असलेले दर १२०० रुपयांनी खाली आले. चांदीचे दर जैसे थे आहेत. सध्या एक किलो चांदीचा दर १०८००० रुपये इतका आहे.

दरम्यान उद्यापासून श्रावण सुरु होणार आहे. श्रावण सुरु होण्याच्या आधीपासून सोन्याचा दर घसरला. श्रावणात सराफा बाजारत सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी दिसण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now