जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२५ । इराण आणि इस्त्रायल यांच्यामधील युद्धाच्या काळात सोन्यासह चांदीचे दर वेगानं वाढत होते. सोन्यासह चांदी दराने उच्चांक गाठला होता. मात्र, इराण- इस्त्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही धातूंचे दर पुन्हा कमी व्हायला लागले आहेत. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

सोने २४ कॅरेटचा दर
आज सोन्याच्या दरात प्रति तोळा १६० रुपयांनी घट झाली आहे. आज सोन्याचे दर ९७,२६० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात १२८ रुपयांनी घट झाली आहे. आजचे दर ७७,८०८ रुपये झाले आहेत.

सोने २२ कॅरेटचा दर
आज १ तोळा सोन्याची किंमत ८९,१५० रुपये आहे. या किंमतीत १५० रुपयांनी कपात झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,३२० रुपये आहेत.
चांदीचा आजचा दर
दुसरीकडे आज चांदीच्या दरातही थोडी घट झाली आहे. ८ ग्रॅम चांदीचे दर ८६१.६० रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १,०७७ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीचे दर १०,७७० रुपये आहेत.











