जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । सावदा येथील लसीकरण पुन्हा एकदा लसी उपलब्ध होत नसल्याने थांबल्या असल्याचे दिसत आहे. शहरात सुमारे 8 दिवसा पासून लसी साठा उपलब्ध होते नसल्याने 45 वर्षा वरील दूसरा डोस घेणारे नागरिक तसेच पहिला डोस घेणारे नागरिक यांना लस मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे दररोज हे नागरिक लसीकरण केंद्रात फे-या मारत आहे. पण त्यांना लस मिळत नसल्याने परत यावे लागत आहे.
दुसरीकडे मात्र लहान गावातील लसीकरण केंद्रात मात्र लस मिळत आहे असा विरोधाभास जाणवत आहे. त्यामुळे येथील नागरिक ज्या गावात लस उपलब्ध आहे तेथे जाऊन त्यांना लस घ्यावी लागत आहे. पण सावदा येथे लस येत नसल्याने नागरिकांची मात्र भटकंती होत आहे.
मागील काही दिवसापूर्वी लसी साठी श्रेय घेणारे विविध राजकीय पदाधिकारी देखील आता याकडे लक्ष देत नसल्याने नागरिक मात्र लसीकरणा पासून वंचित राहत आहे त्यामुळे येथे एकदा परत सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी लक्ष घालून लसिकरण सुरु करावे नुसते सुरु करू नये तर त्यास वेग कसा येईल याकडे लक्ष पुरवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.