जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । भाजपाची सावदा शहर आढावा बैठक शुक्रवार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मान्यवरांच्या उपस्थितित संपन्न झाली. याबैठकीत शहराध्याक्ष निवड, बूथरचना व संघटन या विषयावर सविस्तर व विस्तृत चर्चा करण्यात आली.
यावेळी डॉ अतुल सरोदे यांनी आपले विचार मांंडताना भाजपात आलेली टिएमसी ची किनाऱ्यावरील मंडळी सत्ता न आल्यामुळे परत जात आहेत. पण ज्या लोकांनी पक्ष वाढविण्यासाठी खस्ता खाल्या त्यांच्या मुळे पार्टी टिकून आहे असे सांगितले, तर भाजप रचना विषयी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी सावदा येथै पक्षाचा जनाधार पुर्वी पासून असल्याने शहरांत पुन्हा प्रामाणिक कार्यकर्त्याचा मेहनतीने काम करील असे बोलतांना म्हणाले.
सावदा येथे भाजप तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी बुथवरील बुथप्रमुख व त्यावरील 30 कार्यकर्ते याविषयीची पार्टी भूमिका महत्त्व पटवून सांगितले. तसेच नवीन कार्यकारिणी नावे सुचवण्यात यावे असे प्रतिपादन किसान सेलचे विभाग प्रमुख सुरेश धनके म्हणाले. जगातील सर्वात मोठ्या संघटनेचे कार्य आपल्या सारख्या भाग्यवान मंडळी करीत असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन म्हणाले.
जळगाव जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी आपले विचार मांडले, बैठकीस शिवाजी पाटील,प्रल्हाद पाटील, हरलाल कोळी, महेंद्र पाटील,महेश चौधरी, नितीन कोळी,सारीका चव्हाण,माजी शहराध्यक्ष राजेश भंगाळे, माजी सरचिटणीस गजानन भार्गव, जितेंद्र भारंबे, संतोष परदेशी, विजय पाटील, अतुल ओवे,सागर चौधरी.सचिन बर्हाटे ,अक्षय सरोदे विनोद नेमाडे,लतेश चौधरी,व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान आगामी भाजपा शहराध्यक्ष पदासाठी इछुकांची चाचपणी करून नावे मागविण्यात आली यात शहरातून 5 नावे वर पक्षश्रेष्ठी यांचे कडे पाठविन्यात आली असून त्यानंतर सदर शहराध्यक्ष यांचे नाव थोड्या दिवसात समजेल.