सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री ; खाद्यतेल महागले

जून 23, 2025 7:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२५ । गेल्या पंधरवड्यापूर्वी आयात शुल्क कमी केल्याने खाद्य तेलाचे दर कमी झाले होते. यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु आता पुन्हा महागाईचा भडका उडून दरवाढ झाली. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे घाऊक बाजारांत सर्व प्रकारच्या तेलाच्या दरात किलोमागे तीन ते पाच रुपयांची वाढ झाली. पंधरा किलोच्या डब्यामागे ५० ते ६० रुपये वाढले. युद्धाची स्थिती कायम राहिली तरी दर आणखी वाढू शकतात.

oil 2

मध्यंतरी आयात शुल्क कमी झाल्यामुळे खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात घटले होते. मात्र, आता इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध पेटले आहे. परिणामी खनिज तेलाच्या किमती कडाडल्या. सरकी, पाम आणि सूर्यफूल तेलाच्या दरात वाढ झाली. सध्या तेलाची मागणी कमी आहे. पण, इराण- इस्त्रायलमधील संघर्षामुळे खनिज तेलाच्या किमती बॅरलमागे सहा डॉलरने वाढल्या आहेत.

त्यामुळे आयात होणाऱ्या खाद्यतेलांच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या पंधरवड्यातील खाद्यतेलाच्या दर कपातीचा दिलासा अल्पजीवी ठरला. आता इराण आणि इस्त्रायल युद्धामुळे पुन्हा दरवाढ झाली. युद्ध कधी थांबेल? यावर आगामी काळात दर अवलंबून राहतील, तूर्त तेलाची दरवाढ कायम राहील अशी शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment