जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२५ । सोने आणि चांदी दरातील चढ उताराचे सत्र कायम असून आज २ जून रोजी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळा ३३० रुपयांनी वाढ झाली असून यामुळे आज खरेदीचा बेत आखणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ३३० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर ९७,६४० रुपये झाले आहेत. तर २२ कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी आज तुम्हाला ८९,५०० रुपये मोजावे लागणार आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,६०० रुपये आहे.

चांदीची किंमत
आज चांदीचे भाव स्थिर आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १००० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम चांदी ८०० रुपयांना विकली जात आहे. १००ग्रॅम चांदीची किंमत १०००० रुपये आहे.
सोन्यातील गुंतवणूक
सोने खरेदी करणे म्हणजे एक गुंतवणूक असते. सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. जर जीएसटी जोडला तर सोन्याचे दर हमखास १ लाखांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे अनेकजण सोने खरेदी करता. परंतु सध्या सोन्याचे दर एवढे वाढले आहेत की नागरिकांच्या खिशाला ते परवडत नाही.












