NEET-PG च्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ; मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा

मे 30, 2025 3:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२५ । सर्वोच्च न्यायालयाने NEET-PG २०२५ च्या परीक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET-PG 2025 परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचा आदेश दिला आहे. दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याच्या एनबीईचा निर्णय कोर्टाने फेटाळून लावल्यामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

neet pg high court

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्याने असमानता निर्माण होईल कारण दोन्ही शिफ्टमध्ये दोन्ही पेपर्समधील अडचणीची पातळी वेगवेगळी असू शकते. अशा परिस्थितीत, सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी म्हणून NBE ने एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेणे महत्वाचे आहे असं म्हटलं आहे.सर्व उमेदवार एकाचवेळी एकसारखेच प्रश्नावलीत परीक्षा देऊ शकतात, त्यामुळे ही परीक्षा पद्धत निष्पक्ष आणि पारदर्शक होऊ शकते.

NEET PG परीक्षा 15 जून रोजी असून परीक्षा पूर्ण पारदर्शकतेने एकाच शिफ्टमध्ये घेण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी वेळ NBE कडे आहे. दुसऱ्यांदा देण्यात आलेल्या सवलतीशी संबंधित मुद्द्यावर परीक्षा संपल्यानंतर विचार केला जाईल, असं कोर्टाने सांगितलंय. मात्र NBE ने म्हटले आहे की या वेळेच्या मर्यादेत एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेणे शक्य होणार नाही, असं म्हटलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment