आज जळगाव शहरातील १६ मार्केट राहणार दुपारी २ पर्यंत बंद; कारण काय?

मे 26, 2025 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२५ । तुम्हीही आज जळगाव शहरातील मार्केटमध्ये खरेदीसाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण आज शहरातील १६ मार्केट दुपारी २ पर्यंत बंद ठेवणार येणार आहे.

jalgaon market

या मागील कारण म्हणजे जळगाव महापालिका व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून रेडी रेकनर दराच्या पाच ते सहा टक्क्याप्रमाणे भाडे आकारणीच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी पद्मालय विश्रामगृहात गाळेधारकांची तातडीची बैठक झाली. मनपाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी गाळेधारकांकडून आज सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील १६ मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे.

सकाळी १०.३० वाजता मनपाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती जळगाव महानगर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष शांताराम सोनवणे यांनी दिली. बैठकीत राजस कोतवाल, युवराज वाघ, आशिष सपकाळे, प्रदीप मंडोरा, सुरेश पाटील, तेजस देपुरा आदींची उपस्थिती होती. गाळे भाड्यावर सोमवारी मनपात बैठक होणार आहे. यामुळे रविवारी गाळेधारकांची बैठक बोलावण्यात आली. गाळेधारक हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत,

रेडी रेकनरच्या दीड ते दोन टक्क्याप्रमाणे भाडे भरू शकतात. जर पाच टक्क्याप्रमाणे भाडे आकारले तर गाळेधारक आर्थिक अडचणीत येतील; परंतु सन २०१२ ते २०१९चे भाडे दुप्पट भरायला व्यापारी तयार आहेत, अशी माहिती सोनवणे यांनी दिली. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील यांच्याशीही चर्चा करणार आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत लढा तीव्र करण्याचा इशाराही गाळेधारक संघटनेकडून देण्यात आला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment