भारताने रचला इतिहास! जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला; आता हे तीन देश भारताच्या पुढे?..

मे 25, 2025 10:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२५ । भारताने पुन्हा एकदा आर्थिक आघाडीवर झेंडा फडकवला आहे. भारत आता जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. निती आयोगाच्या अध्यक्षांनी याची घोषणा केली

economics

नीती आयोगाचे सीईओ बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आयएमएफच्या आकडेवारीनुसार, भारताचा जीडीपी आता ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे.

नीती आयोगाच्या १० व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आर. सुब्रह्मण्यम म्हणाले, “सध्या जागतिक राजकीय आणि आर्थिक वातावरण भारताच्या बाजूने आहे. आयएमएफच्या मते, आज भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाली आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.

आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे भारतापेक्षा मोठे आहेत. आपण जे नियोजन केले आहे आणि जे विचारात घेतले जात आहे त्यावर टिकून राहिलो तर अडीच ते तीन वर्षांत आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू, असा विश्वास सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केला. यावेळी सुब्रह्मण्यम यांनी आयएमएफच्या आकडेवारीचा हवाला दिला.

डोनाल्ड ट्रम्प आणि अॅपलच्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केले. अमेरिका शुल्क काय लावेल हे अनिश्चित आहे. परंतू, आम्ही कंपन्यांसाठी उत्पादन करण्याच्या दृष्टीने स्वस्त जागा असणार आहोत, असे ते म्हणाले. मालमत्ता मुद्रीकरण पाइपलाइनचा दुसरा टप्पा तयार केला जात आहे आणि ऑगस्टमध्ये त्याची घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले.

४ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे किती…
४ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे किती असा प्रश्न सर्वांना पडला असणार, म्हणजे 4,000 अरब डॉलर. म्हणजेच भारतीय रुपयांत 400,000 कोटी एवढे होतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment