जळगावात सोन्याच्या दरात तोळ्यामागे १५०० रुपयाची घसरण, चांदीही झाली स्वस्त

मे 1, 2025 10:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२५ । साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोन्याचा दर वाढू लागल्यामुळे खरेदीचा बेत आखलेल्या ग्राहकांची चिंता वाढली होती. मात्र जळगावच्या सराफा बाजारात अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या दरात तोळ्यामागे १५०० रुपयाची घसरण झाली. चांदी दरातही २००० रुपयांनी घसरण दिसून आली. यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदीदरांना काहीसा दिलासा मिळाला.

gold

जळगावच्या सराफा बाजारात अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोने ९६५०० (जीएसटीसह ९९३९३) रुपये तोळा तर चांदी ९९००० रुपये किलो होती. परंतु अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने दरात दीड हजारांनी घसरण झाली असून ते ९५००० (जीएसटीसह ९७८५०) रुपयांवर स्थिरावले. दिवसभरात ९६,००० रुपयांची पातळी गाठल्यानंतर त्यात घसरण झाली.

तर चांदीच्या दरातही एका दिवसात किलोमागे २००० रुपयांनी घसरण (९७००० रुपये किलो) झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, अमेरिका आणि चीनमधील सेटलमेंटमुळे टेरिफ कमी होण्याची शक्यता आहे आणि याच कारणाने २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत कमी झाली आहे.

दरम्यान, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी यंदा सोन्यात तब्बल १५ कोटींची उलाढाल शहरात झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त व्यापाऱ्यांसाठी लाभदायी ठरला असून, उलाढाल दुप्पट झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment