Gold Rate : अक्षय्य तृतीयेला स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, भावात मोठी घसरण

एप्रिल 29, 2025 10:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२५ । गेल्या आठवड्यात एक लाखाचा टप्पा गाठणाऱ्या सोन्याच्या दरात घसरण झाली. विशेष उद्या ३० एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे.  परंतु यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जळगावच्या सुवर्णपेठेत सोने दरात घसरण झाली आहे.

gold 1 jpg webp

सोमवारी (२८ एप्रिल) सोन्याचा भाव ९०० रुपये प्रति तोळ्याने घसरला. यामुळे मंगळवारी सकाळच्या सत्रात जळगाव सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,७०० (जीएसटीसह ९८५७१) रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. दुसरीकडे चांदीचा दर स्थिर दिसून आला असून सध्या चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ९८००० रुपये इतका आहे.

कमकुवत डॉलर आणि अमेरिका आणि चीन मधील व्यापार युद्धामुळे काही दिवसापूर्वी सोने दर जीएसटीसह एक लाखाच्या वर गेला होता. यामुळे लग्न सराईत वाढलेल्या किंमतींनी वधू-वराकडील मंडळी चिंतेत सापडली आहे. मात्र आता त्यात घसरण होताना दिसत आहे.

दरम्यान गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याचा एक तोळ्याचा भाव विनाजीएसटी ७३,५०० रुपये इतका होता. तर चांदीचा दर विनाजीएसटी ८४००० रुपये प्रति किलो इतका होता. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागच्या काही महिन्यात सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली. गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेपासून आतापर्यंत १० ग्रॅम सोन्याचा दर २२२०० रुपयापर्यंत वधारले, तर चांदी १४००० हजारापर्यंत वाढली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment