जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२५ । समाजमन सुन्न करून सोडणारी एक हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगर मधून समोर आलीय. या घटनेत 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या चुलत भावाने डोंगरावरून ढकलून खून केल्याचे समोर आले आहे. ही घटना ऑनर किलिंगची एक धक्कादायक उदाहरण आहे ज्यामुळे संपूर्ण समाज हादरून गेला आहे.
अंबड तालुक्यातील शहागडची नम्रता शेरकर (Namrata Sherkar) बारावीत शिकत होती. तिने वेगळ्या जातीच्या मुलावर प्रेम केल्याने तिच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. या प्रेमाला विरोध करणारा तिचा चुलत भाऊ ऋषिकेश शेरकर हा तिच्या प्रेमाच्या विरोधात होता. त्याच्या दृष्टीने हे प्रेम कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध होते, यामुळे त्याने अत्यंत क्रूर पद्धतीने नम्रताला संपविले.
घटनेच्या तपशीलांनुसार, नम्रता घरातून निघून गेल्यानंतर तिचा चुलत भाऊ ऋषिकेश तिला गोड बोलून डोंगरावर नेण्याचे निमित्त काढले. खवडा डोंगरावर घेऊन गेल्यानंतर, त्याने तिला अंदाजे 200 फूट उंचावरून खोल दरीत ढकलून दिले, ज्यामुळे तिचा तत्काळ मृत्यू झाला. या घटनेने संभाजीनगरचे नागरिक हादरून गेले आहेत.
पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि आरोपी चुलत भावाला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.