विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस ; IMDकडून राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट जारी

जून 12, 2024 11:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२४ । मान्सूनने आता हळुहळु संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली असून यामुळे जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच आता पुढील २४ तासांतही राज्यात पावसाची बॅटिंग सुरू राहील, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.

12junerain jpg webp

या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगडमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

पुढील ३ दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, आणि अकोला जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दुसरीकडे नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव परभणी जिल्ह्यांत देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असू शकतो. त्यामुळे वादळाच्या स्थितीत नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. वीज चमकत असताना मोबाईलचा वापर करू नये तसेच झाडाखाली थांबू नये. घरातील विजेची उपकरणे बंद ठेवावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान जळगावला हवामान खात्याकडून पावसाबाबत कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाहीय. आगामी ४८ तासात मान्सून खान्देशात दाखल होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now