⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

७ महिन्यांपूर्वी चोरलेली २८ लाखांची ४० किलो चांदी मध्यप्रदेशातून हस्तगत

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर सुमारे सात महीन्यांपुर्वी राष्ट्रीय महामार्ग सहा वरील घोडसगाव फाट्यानजिक असलेल्या धाब्याजवळील उभ्या ट्रॅव्हल्समधुन तब्बल सुमारे ४० किलो चांदीची बिस्किटे रु २७ लाख ९७ हजार ५०० किंमतीची चोरी झाल्याची घटना १७ जुन रोजी घडली होती.

दरम्यान मुक्ताईनगर पोलीस सतत आरोपींचा माग काढत होती.याबाबत कारवाईची कमालीची गुप्तता पाळत मध्य प्रदेशातील एका गावातुन ९ रोजी ४० किलो चांदी हस्तगत केली.यासंदर्भात मात्र कोणालाही अटक केली नसल्याचे समजते.तसेच बाकी चौकशीअंती बाधा उत्पन्न होऊ नये म्हणुन माहीती देण्यास नकार दिला.

या कामी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे,डिवाय एसपी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहीतीच्या आधारे मध्यप्रदेशात पोलीस पथक रवाना झाले होते.आठ दिवस तपासाचे चक्रे वेगवान फिरवत पथकातील पीएस आय सुदाम काकडे, पोलीस नाईक संतोष नागरे, नितीन चौधरी, कांतीलाल केदारे,काॅस्टेबल सागर सावे,विशाल पवार यांनी चोखपणे कामगिरी बजावत ४० किलो चांदी हस्तगत केली.

हे देखील वाचा: