कुर्‍हात 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

जुलै 17, 2022 1:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातील 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात नोंद करण्यात आली.

crime 20 jpg webp

सीमा गोकुळ पारधी (26, कुर्‍हा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. विवाहिता आपल्या कुटुंबियांसह कुर्‍हे पानाचे येथे वास्तव्यास होत्या. मात्र, गुरुवारी रात्री १०ते शुक्रवारी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान केव्हा तरी विवाहितेने गळफास घेतली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना शहरातील रीदयम हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र येथील डॉक्टरांनी विवाहितेच मयत घोषित केले. तपास तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now