१० लाख ७५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सप्टेंबर 20, 2021 12:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । पुर्णाड शिवारात मोकळ्या जागेत बायोडिझेलची बेकायदेशीर साठवणूक व काळाबाजार करून विक्री करतांना पुरवठा विभागाने छापा टाकून सुमारे १० लाख ७५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केले आहे. यात दोन जणांना अटक देखील करण्यात आली आहे. व चार जणावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड शिवारातील मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर रस्त्यावर असलेले मुक्ताईनगर तोल काटा येथे राजेंद्र सिताराम वाघले यांच्या मालकीच्या जागेत बायो डिझेलची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून त्यांची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मुक्ताईनगर पुरवठा निरीक्षकांना मिळाली. त्यानुसार रविवारी १९ सप्टेंबर रेाजी रात्री १ वाजता पुरवठा विभागाने छापा टाकून सुमारे ६ लाख ६६ हजार रूपये किंमतीचे बायोडिझेल आणि ४ लाख ९ हजार ४७० रूपयांची रोकड असा एकुण १० लाख ७५ हजार ४७० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक ऋषीकेश तानाजी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी निलेश युवराज सपकाळे रा. निसर्ग कॉलनी असोदा रोड जळगाव, राजेंद्र सिताराम वाघले रा. शहापूर, रितेश नारायणराव दोरताणी (वय-२१) रा. परतवाडा अचलपूर अमरावती, चिराग गोपाल शिराठ (वय-२६) रा. आसोदा रोड जळगाव यांच्यावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोन जणांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now