1 सप्टेंबरपासून ‘हे’ 5 महत्वाचे नियम लागू होणार; थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार?

ऑगस्ट 30, 2025 3:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२५ । २०२५ मधील उद्या ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस. यांनतर संप्टेंबर महिन्याला सुरुवात होईल. आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच असे अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल. त्यांचा परिणाम घरगुती बजेटपासून ते गुंतवणूक आणि बँकिंगपर्यंत सर्व गोष्टींवर दिसून येईल. त्यामुळे हे नवीन नियम आधीच जाणून घेतल्यास आणि त्यानुसार तुमचे नियोजन केल्यास बरे होईल. १ सप्टेंबरपासून कोणते बदल होणार आहेत ते जाणून घ्या.

1st september new rule

एलपीजी सिलेंडरच्या किंमती

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होतात. १ सप्टेंबर रोजीदेखील तेल कंपन्या एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर करतील. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील भावांवर अवलंबून असतात.किमती वाढल्याने घरगुती बजेटवर परिणाम होऊ शकतो आणि स्वयंपाकघरावरील भार वाढू शकतो, परंतु किमती कमी केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

चांदीवरही हॉलमार्किंग अनिवार्य असेल

आतापर्यंत फक्त सोन्यावर हॉलमार्किंग आवश्यक होते, परंतु १ सप्टेंबरपासून सरकार चांदीवरही हा नियम लागू करणार आहे. म्हणजे आता तुम्ही जे काही चांदीचे दागिने किंवा वस्तू खरेदी कराल, ते निर्धारित मानकांसह आणि शुद्धतेसह उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना फसवणुकीपासून संरक्षण मिळेल. तथापि, तज्ञांचे मत आहे की या नियमाचा चांदीच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, जर तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नवीन किमतींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

SBI क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल केले आहेत. दरम्यान, क्रेडिट कार्ड चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जर कोणत्या ग्राहकांचे ऑटो डेबिट फेल झाले तर त्यावर २ टक्के शुल्क आकारले जाईल.

एटीएममधून कॅश काढणे महागणार

दरम्यान, आता एटीएममधून कॅश काढण्याच्या नियमांत बदल केले आहेत. यामध्ये जर तुम्ही लिमिटपेक्षा जास्त कॅश काढली तर तुम्हाला चार्ज द्यावे लागणार आहे.

फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर

सप्टेंबर महिन्यात एफडीवरील व्याजदरातदेखील बदल केले जाणार आहे. सध्या बँका ६.५ टक्के ते ७.५ टक्के व्याजदर देतात. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now