सेवाभावी संस्थेतर्फे 111 कुटुंबाची दिवाळी झाली गोड

ऑक्टोबर 25, 2022 11:08 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । मुक्ताईनगर शहरातील प.पू.गुरुवर्य संत रामभाऊ पूजारी बाबा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रम या सेवाभावी संस्थेकडून दिवाळी निमित्ताने महिलांना साड्यांची व प्रत्येकी कुटुंबाला मोतीचूर लाडु, दराबा लाडू, चकली, शंकरपाळी, मिक्स रतलाम चिवडा, बारीक शेव व पापडी, मिष्टान्न फरसाण साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील पाडे व वस्तीवरील समाजातील वंचित, निराधार, गोर-गरीब व परिसरातील धार्मिक मंदीरावरील साधु महाराजांना मिळून 111 कुटुंबाला वाटप करण्यात आले.

manuskicha jpg webp

दाते संदीप खरे (गणेश झेरॉक्स), श्री स्वामी समर्थ सेवेकरी पुरुषोत्तम वंजारी, डॉ.गणेश माधव येवले (नाशिक), जी.के.महाजन, पी.एम.चौधरी, संतोष पाटील (शेमळदा), मनोज देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करीत वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष किशोर गावंडे, सचिव रामभाऊ टोंगे, रघुनाथ पाटील, किरण महाजन, प्रमोद गावंडे, पटेल सर, सुभाष माळी, मनोज बेलदार, अशोक कोळी व रामरोटी परिवाराचे सेवक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now