जळगावात १०० तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

जुलै 21, 2022 2:17 PM

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । शिवसेनेत फूट पाडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना पद देण्यात आले आहेत. त्यानंतर शिवसेनेचे काही पदाधिकारी शिवसेनेला धक्का देत शिंदे गटात सामील झाले आहे. तर एकीकडे तरुण पार्टी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. काल बुधवारी जळगावत चक्क १०० तरुणांनी संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

jalgoan shivsena

शहरातील अजंठा चौफुली अयोध्या नगर येथील १०० तरुणांनी संपर्क प्रमुख संजय सावंत, महानगर प्रमुख शरद तायडे, मानसिंग सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी गजेंद्र राजपूत, मुकेश अहिरे, नितीन गुप्ता, दत्तात्रेय भगवान मेंटकर यांच्यासह तरुण उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now